कोरेगाव भिमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट

0 झुंजार झेप न्युज

कोरेगाव भिमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट

पुणे,दि.31: जिल्ह्यातील कोरेगाव भिमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली.

यावेळी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि एकाच वेळी मोठी गर्दी होणार नाही अशा प्रकारे दर्शन रांगांचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.