अज्ञात वाहनाच्या धडकेत -दुचाकीस्वाराचा मृत्यु विहामांडवा -चौंढाळा रस्त्यावरील घटना

0 झुंजार झेप न्युज

अज्ञात वाहनाच्या धडकेत -दुचाकीस्वाराचा मृत्यु विहामांडवा -चौंढाळा रस्त्यावरील घटना 

विहामांडवा (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : चौंढाळा रस्त्यावर अज्ञात वाहनाने एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याने मृत्यु झाल्याचीघटना घडली असुन घटना स्थळावरुन अज्ञात वाहन पसार झाले आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत मिळालेली माहिती अशी की दि.21/12/21 मंगलवार रोजी सायं 6ः30 ते 07 वाजे दरम्यान विहामांडवा-चौंढाळा रस्त्यावरुण जाणा-या काही नागरीकांनाअपघातग्रस्त दुचाकीसह एक व्यक्ती बेशुध्द अवस्थेत आढळुन आला त्यांनी तात्काळ विहामांडवा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यादव सोनकांबळे यांनी प्राथमिक उपचार केले व अपघात ग्रस्त व्यक्ति ची परिस्थीती गंभीर असल्याने पुढिल उपचारार्थ वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे हलवले तो पर्यंत अपघात ग्रस्त व्यक्ति कोण आहे याचा शोध स्थानिक नागरिक व्हाट्अॅप च्या माधयमातुन सदरिल व्यक्तीचे वर्णण विशद करुण माहिती घेत असता वाल्मिक रखमाजी नाईकवाडे वय 37 वर्ष रा.भांबेरी ता.अंबड जि.जालना येथिल असल्याचे समजले नातेवाईकांना घटनेची माहिती देत त्यांना तात्काळ औरंगाबाद येथे सांगण्यात आले होतेतेथिल वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन मृत्यु झाल्याचे घोषित केले दि.22/12/21रोजी भांबेरी येथे दु.03ः00 वाजताशोकाकुल वातावरणात वाल्मिक वर अंत्यसंकार करण्यात आले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.