आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

0 झुंजार झेप न्युज

आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

पिंपरी चिंचवड,दि.21: आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून रविवार दि. 19 डिसेंबर 2021 रोजी प्रभाग क्रमांक 15 निगडी प्राधिकरण येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. निगडी प्राधिकरण भागातील नागरिकांकडून आमदार बनसोडे यांच्या कडे पेव्हिंग ब्लॉक बसविणे,अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे,रस्ता काँक्रीटीकरण हौसिंग सोसायट्यांचे अद्यावत करणे इत्यादी कामे करून देण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्यांच्या मागण्यांची दखल घेत आमदार बनसोडे यांनी विविध विकासकामासाठी 1 कोटी 10 लाखाचा आमदार निधी मंजूर करून आणला. 

निगडी प्राधिकरण मधील सुखवानी प्लाझा,मनीषा अपार्टमेंट, शितछाया सोसायटी, प्रबोधन सोसायटी, शुभम पार्क,गणेश मंदिर गणेश बाग, त्रिमूर्ती सोसायटी व परमार पार्क या सर्व सोसायटी व धार्मिक स्थळी पेव्हिंग ब्लॉक बसविणे,अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे,रस्ता काँक्रीटीकरण करणे यासारख्या विविध विकास कामासाठी 1 कोटी 10 लाखाचा आमदार निधी मंजूर करून आणण्यात आला. तसेच तक्षशिला बुद्ध विहार व नालंदा बुद्ध विहार यांना विशेष निधी म्हणून प्रत्येकी एक कोटी मंजूर करण्यात आले आहेत व त्यातून तेथील विकास कामे पार पाडण्यात येणार आहेत.या सर्व विकासकामांचे भूमिपूजन काल आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

संवेदनशील व जनतेची आवश्यक आणि गरजे ची कामे तातडीने पूर्ण करणारा नेता म्हणजे आमदार अण्णा बनसोडे अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली .

या वेळी बोलतांना आमदार बनसोडे म्हणाले की , यापुढे देखील लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन जेवढे शक्य होईल त्या सर्व सोसायट्याचे अद्यावतीकरणाचे काम पुढील काळात देखील सुरू राहील.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मा उपमहापौर व विद्यमान नगरसेविका शैलजा ताई मोरे, राजू गावडे, तक्षशिला बुद्ध विहाराचे प्रताप सोनवणे, नालंदा बुद्ध विहाराचे ओव्हाळ सर, माजी महापौर आर एस कुमार, निलेश शिंदे, सिध्दार्थ बनसोडे, सतीश लांडगे, पल्लवी पांढरे व सर्व सोसायट्याचे पदाधिकारी व प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.