नगरपंचायती निवडणूक संदर्भात पेडन्यूजबाबत समिती स्थापन

0 झुंजार झेप न्युज

नगरपंचायती निवडणूक संदर्भात पेडन्यूजबाबत समिती स्थापन

जालना,दि.16: जालना जिल्हयातील घनसावंगी, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर व तीर्थपूरी या पाच नगर पंचायतीच्या सदस्य पदाचा सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नगर पंचायत क्षेत्रात उमेदवार, राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये वर्तमानपत्रामधील बातम्यांच्या स्वरुपात आपली जाहिरात करतात. या जाहिरातीचे दृश्य स्वरुप जरी बातमीसारखे असले तरी प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांना किंमत देऊन अशा बातम्या छापुन आणल्या जातात, अशा बातम्यांच्या संदर्भात आलेल्या तक्रारीवरुन चौकशी करुन निर्णय देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुंषगाने छापील प्रसार माध्यमांवर देण्यात आलेल्या पेड न्यूजच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या या समितीत सदस्य म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, मिडिया प्रतिनिधी, संबंधित नगर पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे आहेत तर सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.