नागरिकांनो, लसीकरणासाठी आवर्जून पुढे या- जिल्हाधिकारी संदीप कदम

0 झुंजार झेप न्युज

नागरिकांनो, लसीकरणासाठी आवर्जून पुढे या- जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा,दि.9: कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हे एक महत्वाचे शस्त्र आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्यासाठी शासन - प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांचेसुध्दा यात सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी आवर्जून पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी कदम म्हणाले, ज्या नागरिकांचा पहिला डोस घेणे बाकी आहे, त्यांनी तो त्वरीत घ्यावा. तसेच ज्या नागरिकांचा दुसरा डोजचा कालावधी आला असेल त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी.  

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून दुर्लक्षामुळे पुन्हा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक बिनाधास्त विनामास्क वावरत असल्याचे निदर्शनास आले. ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गाफील राहू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

95 टक्के लोकांनी पहिला तर 66 टक्के लोकांनी घेतला दुसरा डोज : संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रतिदिन जवळपास 120 ते 130 केंद्रावर लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण पात्र लाभार्थी 8 लक्ष 98 हजार 400 आहेत. यापैकी आतापर्यंत पहिला डोज घेणाऱ्यांची संख्या 8 लक्ष 54 हजार 770 (95 टक्के) असून दुसरा डोज 5 लक्ष 91 हजार 147 (66 टक्के) नागरिकांनी घेतला आहे. ज्या नागरिकांचे अद्यापही लसीकरणाचे प्रलंबित आहे त्यांनी लसीकरण करुन घ्यावे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.