ह प्रभागा मध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

0 झुंजार झेप न्युज

ह प्रभागा मध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 

पिंपरी चिंचवड,दि.9: प्रभागातील विविध स्थापत्य, उद्यान विषयक कामे लोकप्रतिनिधींसमवेत समन्वय साधून तातडीने पूर्ण करा असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ह प्रभाग कार्यालयात आज झालेल्या बैठकीत दिले.

कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या ह प्रभाग कार्यालयामध्ये महापौर माई ढोरे यांनी आढावा बैठक घेतली. उद्यान, स्थापत्य आणि सुरक्षा विभागाबाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत प्रशासनाला महापौर ढोरे यांनी निर्देश दिले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्य राजू बनसोडे, संतोष कांबळे, ज्ञानेश्वर थोरात, नगरसदस्या शारदा सोनवणे, स्वाती काटे, ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक उद्यान अधिक्षक गोरख गोसावी, उपअभियंता आर. व्ही क्षिरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसदस्यांनी विविध मुद्दे बैठकीत मांडले. यामध्ये उद्यानांची दुरावस्था झालेली आहे, झाडांच्या फाद्यांची छाटणी वेळोवेळी करावी, उद्यानातील कचरा वेळेत उचलावा, उद्यानातील तुटलेल्या खुर्च्या दुरुस्त कराव्यात, उद्यानात नेमणूक केलेले सुरक्षा कर्मचारी जागेवर उपस्थित राहतील याकडे लक्ष द्यावे, उद्याना शेजारील जागेत अनधिकृत वास्तव्य तसेच अस्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशा विविध मुद्यांचा समावेश होता.

उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत महापौर माई ढोरे यांनी संबंधित अधिका-यांना विचारणा केली. तसेच विविध सूचना आणि निर्देशदेखील महापौर माई ढोरे यांनी दिले. त्या म्हणाल्या, प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारितील कामे करताना प्रभागातील नगरसदस्यांना त्या कामाबदद्ल माहिती दिली पाहिजे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करणे गरजेचे असते. नागरिकांनी सांगितलेल्या योग्य कामास प्राधान्य देण्यात यावे. वृक्षारोपण करताना योग्य

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.