विधान परिषद निवडणुक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

0 झुंजार झेप न्युज

विधान परिषद निवडणुक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी 

बुलडाणा,दि.5: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला - वाशिम - बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2021 जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे निरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्ह्यातील सिंदखेड राजा व लोणार येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्राची पाहणी 4 डिसेंबर रोजी तर लोणार येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्राची पाहणी 5 डिसेंबर रोजी केली. यावेळी त्यांनी मतदार संख्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान केंद्रांवरील साहित्य, प्रशिक्षण आदींची माहिती संबधित अधिकाऱ्यांकडून घेतली. सिंदखेड राजा येथे तहसीलदार सुनील सावंत उपस्थित होते. तसेच लोणार येथील भेटीप्रसंगी तहसीलदार सैफन नदाफ उपस्थित होते. त्याचप्रमाणे निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.