आज 8/ग आणि 3/क प्रभागात प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई - रु. 50 हजार दंड वसूल !

0 झुंजार झेप न्युज

आज 8/ग आणि 3/क प्रभागात प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई - रु. 50 हजार दंड वसूल !

कल्याण-डोंबिवली,दि.4: महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दि. 3 जानेवारी ते दि.9 जानेवारी या दरम्यान "प्लास्टिक निर्मुलन" सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आज 8/ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक नरेंद्र धोत्रे व आरोग्य निरिक्षक सुर्वे यांचे समवेत डोंबिवली पूर्व उत्कर्ष चायनिज सेंटर, सचिन स्नॅक्स बार, बिस्मिला बिर्याणी कॉर्नर सेटर इ. यांच्याकडील 4 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांना रु. 15 हजार दंड आकारला.

महापालिकेच्या 3/क प्रभागातही सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक योगेश जगताप, आरोग्य निरिक्षक संदीप खितमतराव, दत्तराम सावंत, जगन्नाथ वड्डे यांचे समवेत कल्याण पश्चिम येथील सावंत स्नॅक्स, मधुरम डेअरी,बिकानेर स्वीट्स, सद्गुरु कृपा, मे साईबाबा किराणा स्टोअर्स इ. यांच्याकडील 8.5 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांना रु. 35 हजार दंड आकारला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.