आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्फत निराधारांना आधार

0 झुंजार झेप न्युज

आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्फत निराधारांना आधार

पिंपरी चिंचवड,दि.24: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचे काम पिंपरी मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्याने सुरू आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून ४५ पेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वहस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील शेकडो लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

सदर योजने मध्ये निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले , अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग , कर्करोग , एडस , कुष्ठरोग या सारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला , निराधार, विधवा , घटस्फोट झालेल्या परंतु पोडगी न मिळालेल्या महिला , देवदासी, ३५ वर्षा वरील अविवाहित महिला, या सर्वाना या योजनेचा लाभ मिळतो. या लोकांना दरमहा सानुग्रह अनुदान एक हजार ते बाराशे रुपये पर्यंत बँक अकाउंट ला जमा होतात.

यावेळी आमदार बनसोडे यांनी संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष आनंद बनसोडे यांच्या कडून योजना व लाभार्थ्यांची माहिती घेतली व पुढील काळात प्रत्येक योजना ही जास्तीत जास्त गरजू निराधार व पात्र लोकांपर्यत पोहचवावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. .यावेळी संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष आनंद बनसोडे, सदस्य नासिर शेख, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अध्यक्ष आनंद बनसोडे यांनी आ.बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात जास्तीत जास्त गरजू लोकापर्यंत पोहचून त्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे सांगितले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.