पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

पिंपरी चिंचवड,दि.23: प्रखर देशाभिमान आणि उत्तम संघटन कौशल्य  असलेले स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांचे प्रभावी नेतृत्व  तरुण पिढीमध्ये संघटनात्मक बांधिलकी रुजावी यासाठी महत्वपूर्ण ठरत असून  त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.  

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे  यांच्या जयंतीनिमित्त महापौर माई ढोरे यांनी  सर्वाना शुभेच्छा दिल्या.  त्यावेळी त्या बोलत होत्या.  

या कार्यक्रमास  शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे , ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी  आदी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.