विहामांडवा येथे डॉक्टरांनी रात्री रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी , पत्रकार संघाची मागणी

0 झुंजार झेप न्युज

विहामांडवा येथे डॉक्टरांनी रात्री रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी , पत्रकार संघाची मागणी

विहामांडवा,दि.12: डॉक्टरांची चोवीस तास सेवा हे फलक आता फक्त विहामांडवा परिसरामध्ये नावापुरती राहिल्याचे अनुभव बघावयास मिळत आहे, त्यामुळे अशा गंभीर समस्यांची विहामांडवा पत्रकार संघाने दखल घेत रात्रीच्या वेळेस आलेल्या रुग्णांना सेवा देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे गावासाठी ग्रामपंचायत मिनी मंत्रालय असल्यामुळे सरपंच याच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले विहामांडवा हे गाव असून जवळपास तीस-पस्तीस गावांचा व्यवहार या गावाशी जोडला गेलेला आहे, परिसरातील दह्याळा ,भांबेरी , चुर्मापुरी, रेनापुरी, मिरखेडा,खंडाळा ,चौंडाळा ,रामनगर ,शिवाजी नगर, हनुमान नगर, विठ्ठल नगर, टाकळी ,ब्राह्मणगाव , हिरडपुरी, ईंन्देगाव अशा अनेक प्रकारची गावे आडमार्गे येत असल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्यांना विहामांडवा येथील दवाखान्या शिवाय दुसरा पर्याय नाही. जर रात्रीच्या वेळेस आजारी व्यक्ती दवाखान्यात आली तर येथील डॉक्टर सेवा देण्यास टाळाटाळ करत असल्याची परिसरात बोलले जात आहे. त्याकरिता आशा गंभीर उद्भवलेल्या समस्येची दखल घेत पत्रकार संघाने गावासाठी मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय सरपंच यांच्याकडे विनंती केली असून रात्रीच्या वेळेस सर्व डॉक्टरांनी आपसात विचारविनिमय करून रात्री सेवा द्यावी, अशा प्रकारची मागणी केली आहे. सदर समस्याची परिसरातील सर्व डॉक्टरांनी विचारविनिमय करून सेवा द्यावी नसता संबंधित विभागाकडे पत्रकार बांधव लेखी निवेदनाद्वारे न्याय मागणार आहे. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम पा.थोटे, कैलास पा.सातपुते,युनूस पठाण, मुन्ना टेलर, समाजसेवक तथा पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस, किशोर धायकर, शौकत शेख, आधी पत्रकार यांची उपस्थिती होती,

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.