हिरडपुरीमध्ये अवैध वाळु साठ्यावर पैठण महसुल पथकाची कारवाई

0 झुंजार झेप न्युज

हिरडपुरीमध्ये अवैध वाळु साठ्यावर पैठण महसुल पथकाची कारवाई 

पैठण,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) दि.25: तालुक्यातील हिरडपुरी येथील नदीच्या बाजुच्या दिशेने पाहाणी केली असता महानुभाव मंदिराच्या मागील बाजूस बाजुच्या शेताजवळ नदीच्या उत्तरेस दिशेला मंदिराच्या पश्चिम बाजुला मंदीरापासुन अंदाजे 100 ते 150 मीटर वर अवैध वाळुचा दिसुन आला, गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या अवैधरित्या उपसा केलेल्या लाखो रुपयांच्या वाळू साठ्यावर महसूल विभागाच्या भरारी पथकाने सोमवार २४ जानेवारी रोजी कारवाई करून 7 ते 8 ब्रास वाळू साठा हस्तगत केला आहे. जप्त मुद्देमाल रात्री उशिरापर्यंत पैठण येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून जमा करण्याचे काम तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले, 

जिल्हा प्रशासनाने पैठण तालुक्यातील गोदावरी नदीतील विविध गावांचा वाळू उपसा बंद केलेला असताना देखील या वाळू धंद्यातील सराईत वाळू चोरांनी वेगवेगळे फंडे वापरून रात्रंदिवस गोदावरी नदीतील वाळू चोरण्याचा उच्छाद मांडला. ग्रामीण भागातील गावात धुमाकूळ घालून दहशत निर्माण केल्यामुळे व वाळू चोरांना स्थानिक पातळीवर विविध विभागाच्या लोकसेवकांनी अर्थपूर्ण संबंधातून पाठबळ दिल्यामुळे वाळू चोरांनी दिवसाढवळ्या हिरडपुरी परिसरात अवैधरित्या गोदावरी नदीतून वाळू उपसा करून मिळेल त्या जागेवर वाळू साठ्याचा बाजार मांडला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पैठण तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे कर्तव्य दक्ष मंडळाधिकारी सुखानंद बनसोडे,यांच्या नेत्वृवात तलाठी निकमसाहेब ,कोतवाल रवि सोनटक्के,कोतवाल सोमनाथ कोल्हे व ड्रायव्हर सतिश दळवे यांच्या भरारी पथकाला हिरडपुरी येथे कारवाई करण्यासाठी पाठविले. सदरील पथकाने गोदावरी नदीतून उपसा करून साठवून ठेवलेली ८ ते १० ब्रास वाळू जप्तीची कारवाई केल्याने तात्काळ तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी हिरडपुरी येथे जाऊन पाहणी करून हस्तगत केलेल्या वाळू साठ्याचा मुद्देमाल पैठण येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रात्री उशिरापर्यंत जप्त वाळू पैठण तहसील कार्यालयात आणण्याचे काम सुरू होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.