विहामांडवा एम आय एम शाखेचे उद्घाटन

0 झुंजार झेप न्युज

 विहामांडवा एम आय एम शाखेचे उद्घाटन

विहामांडवा(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): एम आय एम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष समीर साजीद बिल्डर यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील इंदिरानगर भागात नुकतेच शाखेचे उद्घाटन करण्यात आले. एम आय एम पक्ष विहामांडवा सर्कलमधून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्ण तयारी निशी लढणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले.यावेळी विहामांडवा येथील आरेफ शेख यांना एम आय एम पक्षाचे विहामांडवा सर्कल अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

विहामांडवा सर्कलमधून एम आय एम पक्षातर्फे जिल्हा परिषद उमेदवार आरेफ शेख हेच असतील असेही आवर्जून सांगितले या वेळी शाखा अध्यक्ष बाळासाहेब टकले ,उपाध्यक्ष इम्रान शेख ,गणेश पाखरे ,आनंद बनसोडे, सरताज पठाण ,मंजूर शेख, पत्रकार विक्रम थोटे, भारतीय पत्रकार महासंघाचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष इम्तीयाज शेख,नितीन ब्रह्मराक्षस,जावेद शेख, किशोर धायकर ,माणिक बनसोडे, व गावकरी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.