*कोरोना अलर्ट : प्राप्त 545 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 68 पॉझिटिव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 522 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 454 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 68 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 60 व रॅपिड चाचणीमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 191 तर रॅपिड टेस्टमधील 263 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 454 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगाव शहर : 4, खामगाव तालुका : शेलोडी 1, शेगाव शहर : 2, शेगाव तालुका : गायगाव 2, भोनगाव 1, संग्रामपूर शहर :1, बुलडाणा शहर :8, बुलडाणा तालुका : हनवतखेड 1, जांब 1, चिखली शहर : 17, चिखली तालुका : खंडाळा 1, शेलुद 1, खैरव 1, दिवठाणा 1, साकेगाव 3, भालगाव 1, उंद्री 1, माळशेंबा 3, मेहकर तालुका : लव्हाळा 1, मेहकर शहर :3, सि. राजा तालुका : साखरखेर्डा 1, गोरेगाव 1, मलकापूर शहर :1, लोणार शहर :1, लोणार तालुका : चोरपांग्रा 1, टिटवी 2,. नांद्रा 1, आरडव 1, सावखेड 1, नांदुरा तालुका : निमगाव 1, मोताळा तालुका : लपाली 1, परजिल्हा : तेल्हारा 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 68 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 68 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना येथील 83 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 794457 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98640 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97323 आहे. आज रोजी 1423 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 794457 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 97323 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97323 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 632 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 685 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
