महापालिकेच्या विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई!
नवी मुंबई, दि.4: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 10/ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व, भोपर गाव येथील जागा मालक रतीलाल गुप्ता यांच्या तळ+2 मजल्याच्या आर.सी.सी. इमारतीच्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, यांचे मदतीने व 1 पोकलेन, 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी अ प्रभाग क्षेत्र कार्यालया अंतर्गत टिटवाळा पूर्व/ पश्चिमेला जोडणा-या मांडा रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (ROB) पूर्वेकडील लँडिंग मध्ये येणारे आठ स्ट्रक्चर्स संपूर्णपणे निष्कासित करण्याची कारवाई आज केली. तसेच टिटवाळा पूर्व इंदिरानगर भागातील रहदारी नसलेल्या भागात काम चालू असलेल्या चाळींच्या बांधकामाच्या आठ खोल्या निष्कासनाची धडक कारवाई देखील करण्यात आली. सदर कारवाई क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल, अ आणि क प्रभागाचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांचे मदतीने व 2 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
तसेच विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 7/ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम येथील सुरेश भुवन इमारतीच्या बाजूला, भारत माता शाळेच्या मागे बांधकामधारक सुरेश गायकवाड याचे राज्य शासनाच्या भूखंडावरील आर.सी.सी फुटींगचे बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज केली.सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांचे मदतीने व 1 पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली.
2/ब प्रभागातही सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कल्याण पश्चिम, सापाड येथील 3 रुमचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई तसेच डी.बी.चौक, वसंत व्हॅली, गोदरेज हिल चौक , रौनक सिटी परिसरातील रस्त्यावरील 26 शेडस् अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचा-यांचा मदतीने हटविण्यात आले.
