विद्यार्थींच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली महाविद्यालय परिसराची पहाणी

0 झुंजार झेप न्युज

विद्यार्थींच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली महाविद्यालय परिसराची पहाणी

सातारा,दि.16: विद्यार्थींनीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स व छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसराला अचानक भेट देऊन पहाणी करुन सुरक्षतेच्या दृष्टीने विद्यार्थींनीशी संवाद साधला.यावेळी श्री. देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थींनीच्या सुरक्षतेसाठी पोलीस विभागातील कर्मचारी साध्या वेशात महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घालत आहेत. महाविद्यालयांचे विद्यार्थी नसतानाही महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या मुलांना आजच्या दिवस समज देवून सोडण्यात आले आहे.

विद्यार्थींनींना मोकळ्या वातावरणात व निर्भयपणे शिक्षण घेता यावे म्हणून महाविद्यालय परिसरात निर्भया पथक काम करीत आहे. त्यांचे काम चांगल्या प्रकारे सुरु असून विद्यार्थींनींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे शासनाची प्राथमिकता आहे, असेही श्री. देसाई यांनी पहाणी वेळी सांगितले.महाविद्यालय परिसरात साध्या वेशात पोलीस व महिला पोलीस कर्मचारी असतात. त्यामुळे आम्हाला महाविद्यालय परिसरात भितीचे वातावरण वाटत नाही. आम्ही मोकळ्या वातावरणात व निर्भयपणे शिक्षण घेत असल्याच्या भावना विद्यार्थींनीनी श्री. देसाई यांना बोलून दाखविल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.