जिल्ह्यात नोंदणीची प्रक्रिया सुरळीत व काटेकोरपणे राबवा- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

0 झुंजार झेप न्युज

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

जिल्ह्यात नोंदणीची प्रक्रिया सुरळीत व काटेकोरपणे राबवा

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

अमरावती,दि.18: केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हंगाम 2021-22 मध्ये हरभरा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात एकूण आठ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. केंद्राच्या ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हरभरा उत्पादक बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरळीत व काटेकोरपणे राबवावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

नाफेडतर्फे जिल्ह्यात आठ ठिकाणी नोंदणी सुरू

जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदूर रेल्वे, धारणी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत, तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पथ्रोट व नेरपिंगळाई येथे विविध कार्यकारी सह. संस्था, नेरपिंगळाईमार्फत नोंदणी सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीतपणे राबवावी. शेतकरी बांधवांना व्यवस्थित माहिती देऊन प्रत्येकाची नोंदणी करून घ्यावी. नोंदणीपासून कुणीही वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

हरभरा विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती जिल्हा पणन अधिकारी जिल्हा पणन अधिकारी के. पी. धोपे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आधारभूत किंमत खरेदी योजनेत यंदाच्या हंगामात हरभरा विक्रीसाठी शेतकरी बांधवांनी ई-पीक ॲपद्वारे पीकपे-याची नोंद केलेला सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आधारकार्डाची झेरॉक्स प्रत, आधार लिंक बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. पासबुकावर शेतक-याचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, असे श्रीमती धोपे यांनी सांगितले.हरभ-याचा हमीभाव ५ हजार ४०० रूपये आहे. हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Adv. Yashomati Thaku

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.