"घनकचरा नव्हे तर धनकचरा" या डॉ.रामदास कोकरे यांच्या संकल्पनेचा सी.बी.एस. ई च्या शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव!-रामदास कोकरे

0 झुंजार झेप न्युज

"घनकचरा नव्हे तर धनकचरा" या डॉ.रामदास कोकरे यांच्या संकल्पनेचा सी.बी.एस. ई च्या शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव!-रामदास कोकरे

कल्याण-डोंबिवली:  महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विद्यमान उपायुक्त डॉ.रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी असताना वेंगुर्ला परिसरात शून्य कचरा मोहिमेबाबत भरीव काम केले, त्यांच्या या कामाची दखल सी.बी.एस.ई बोर्डाने घेतली असून इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात या विषयाबाबतच्या धड्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे .याशिवाय कर्जत, माथेरान मध्ये देखील डॉ रामदास कोकरे यांनी वेंगुर्ला प्रमाणे कचरा विरहित शहर व डंपिंग ग्राउंड विकसित केले आहे. माथेरान नगरपरिषद ने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एका रस्त्याला "मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग " असे नांव दिले आहे. स्वच्छते बाबत कमालीचे शिस्तप्रिय, सजग आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे डॉ कोकरे यांनी आता पर्यंत च्या शासकीय सेवेत 30 कोटी रु.हून अधिक रक्कम बक्षीस रूपाने विविध शहरांना प्राप्त करून दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू झाल्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना साथ ऐन भरात असतानादेखील उपायुक्त डॉ.रामदास कोकरे यांनी शून्य कचरा मोहिमेचा प्रारंभ दि. 20/05/2020 पासून केला आणि कल्याण डोंबिवली परिसर कचरा मुक्त होण्यासाठी ते भगीरथ प्रयत्न करीत आहेत. डॉ .रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात कार्यरत असताना राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल आता शासनाने घेतली असून वेंगुर्ले पॅटर्नचा धड्याचा समावेश आता सीबीएससी अभ्यासक्रमातील मुलांच्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आल्याने, डॉ. रामदास कोकरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.