जिल्हा परिषदेत जलजिवन मिशन अंतर्गत कार्यशाळा प्रत्येक ग्रामस्थाला गुणवत्तापुर्वक पाणी मिळावे- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

0 झुंजार झेप न्युज
जिल्हा परिषदेत जलजिवन मिशन अंतर्गत कार्यशाळा
प्रत्येक ग्रामस्थाला गुणवत्तापुर्वक पाणी मिळावे- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 


यवतमाळ,दि.9: जल जिवन मिशन अंतर्गत घर घर नल से जल हे शासनाचे मुख्य ध्येय असून ग्रामस्थाना शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मागील दोन वर्षापासुन जल जिवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचे विविध कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. प्रत्येक ग्रामस्थाला गुणवत्तापुर्वक पाणी मिळावे यासाठी गावस्तरावर एच टु एस फिल्ड टेस्ट किट द्वारे पाणी कसे तपासावे याबाबत प्रत्येक ग्रामस्थांना प्रशिक्षीत करण्यात यावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या.
जिल्हा परिषद सभागृहात जल जिवन मिशन अंतर्गत फील्ड टेस्ट किट व जेजेएम अॅप कार्यशाळा घेण्यत आली. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार चौधर, कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पि. एस. चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्वच्छता व शुध्द पाण्यामुळे पुर्वीपेक्षा गावात साथरोग उद्भव कमी होत असल्याचे सांगीतले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जल जिवन मिशन हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने विहीत मुदतीत हे प्रशिक्षण पुर्ण करुन सर्व संबधित विभागाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रंसगी जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक प्रंशात पाटील व पाणी गुणवत्ता सल्लागार सुवर्णा जरोदे यांनी पिपिटी द्वारे फिल्ड टेस्ट किट व जेजेएम अॅप ऑनलाईन एन्ट्री याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 
प्रशिक्षणाला जिल्हातील सर्व तालुकयातील विस्तार अधिकारी आरोग्य, आरोग्य सेवक, जेजेएम मधील समाजशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा प्रतिनिधी तसेच जिल्हा तज्ञ पुंजाजी देशमुख कविता सराफ स्वप्नील देशमुख, वंदना ढवळे, महीद्र गुल्हणे, प्रशात भवरे, नितीन टिकले व सर्व कर्मचारी उपस्थित होतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.