प्रकाशझोतापासून वंचित महिला हिरकणी पुरस्काराने सन्मानित

0 झुंजार झेप न्युज

प्रकाशझोतापासून वंचित महिला हिरकणी पुरस्काराने सन्मानित

पुणे : विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणार्‍या महिलांचा गौरव होत असतोच पण समाजात मोलाचे काम करणार्‍या, कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यासाठी, कोणतेही कष्ट करण्यासाठी झटणार्‍या अशा कष्टकरी महिला आणि समाज कार्य करणार्‍या महिला अशा सन्मांनान पासून आणि प्रकाशझोतापासून वंचितच राहतात.अशाच छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 30 महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य निमित्त ‘हिरकणी पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला.शाल श्रीफळ, सन्माचिन्ह फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा कार्यक्रम कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन आणि संध्या भोसले व राहुल भोसले मित्र परिवार आयोजित केला असून काल 9 मार्च 2022 रोजी पं . जवाहरलाल नेहरु सांस्कतिक भवन घोले रोड , छ . शिवाजी महाराज नगर , पुणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी रमेश बागवे (शहराध्यक्ष,पुणे शहर जिल्हा काँग्रेस), .दत्ता बापू बहिरट ( मा. अध्यक्ष विधीसमिती), मोहन जोशी (माजी आमदार), दिप्तीताई चौधरी (माजी आमदार), डॉ. हाजी जाकिर शेख (सरचिटणीस महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस कमिटी), पूजा आनंद (महिला शहराध्यक्ष,पुणे शहर काँग्रेस), गौरव बोराडे, सोमेश्‍वर बालगुडे, बाळासाहेब बाणखेले उपस्थित होते. केएसीएफ फाऊंडेशन, रूपाली स्पोर्टस क्लब, मानव प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य आणि राहुल भोसले मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले.

पुरस्कार मानकरी ठरलेले : 1) कु. स्मिता जयकिरण सोदे-कराटे प्रशिक्षक, 2) सौ. इंदूबाई गोविंद गोजारे, 3) सौ. पुनम हरिभाऊ शिंदे, 4) सौ. हेमा सचिन दातखिळे , 5) सौ. शालिनी मारूती रायकर (आदर्शमाता), 6) सिंधु बापू शिरसाट (स्वच्छ सेवा सेवक), 7) अ‍ॅड. सौ. ज्योती रणजीत भोंडवे, 8) शैनाज रफिक शेख, 9) सौ. भारती शहाजी खेडेकर, 10) सौ. रतन चद्रकांत मोरे, 11) श्रीमती, सुवर्णा नितीन परदेशी, 12) सौ. वैजयंती शांताराम सोवळे, 13) श्रीमती सुनिता शिवाजी पवार , 14) दिपा राजू भेकरे , 15) डॉक्टर कु.मोनिका मोहन पानसरे, 16)सौ.आरती विकास मेस्त्री(मळेवाडकर)(दैनिकसकाळ पत्रकार), 17) सौ. मिनिता शरद पाटील (समाजसेविका), 18) कु.मोनिका प्रशांत टेंबरे (रांगोळी कलाकार), 19) कु.राजश्री रामु संघाटी (‘प्रोफेसर’), 20) हिरा सिद्धपा शिवांगी (अंगणवाडी शिक्षिका),

21) सौ.पूनम अमित तिवारी (शिक्षिका), 22) सौ. रेखा नारायण जाधव, 23) सुरेखा आनंद गायकर (शिक्षिका), 24) लता दिलीप पाकेरे (अंगणवाडी शिक्षिका),

25) सौ. स्नेहल शंकरराव सोरटे (व्यवसाय), 26) सौ. वीणा नितिन कुढले. (बी.ए. संगित विशारद), 27) जमुनाताई लक्ष्मन माने, 28) सौ.सुजाता शिवा माळी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.