अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव निधीचा गैरवापर केल्यास सक्त कारवाही करण्याची सूचना रामदास आठवले यांनी दिली

0 झुंजार झेप न्युज

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव निधीचा गैरवापर केल्यास सक्त कारवाही करण्याची सूचना रामदास आठवले यांनी दिली

नागपूर : रामदासजी आठवले (सामाजिक केंद्रीय न्याय मंत्री )यांचा आज भंडारा जिल्ह्यात दौऱ्यासाठी आले होते.त्यात शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर चर्चा केली असता त्यात मा.श्री.संघरत्न ऊके हे देखील उपस्थित होते.त्यात त्यांनी सांगितले की,मी केंद्रीय मंत्री असल्यामुळे मी,कसल्याही प्रकारचा निधी सामाजिक क्षेत्रात कमी पडू देणार नाही त्यात संघरत्न उके यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न केला. की,नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतीला केंद्रीय वित्त आयोगातून निधी दिला आहे.पंरतु तो एकुण निधिपैकी 15 टक्के निधी हा अनुसूचित जाती साठी वापर करण्याची तरतूद केली आहे. तो निधी ग्राम पंचायत कडून अनुसूचित प्रवर्गाच्या विकासासाठी प्रत्यक्ष खर्च न करता त्यांचा गैरवापर केला.तो निधी हळप केला आहे.व कागदोपत्रीच खर्ची घातलाआहे. प्रत्यक्षात लाभार्थी गटाला लाभ मिळालेला नाही.अनेक ठिकाणी असे आढलून आले आहे.सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवित असतात.अशातच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव निधीचा गैरवापर केल्यास सक्त कारवाही करण्याची सूचना मा.श्री. रामदासजी आठवले सामाजिक केंद्रीय न्याय मंत्री यांनी केली.पुढे म्हणाले की भ्रटाचार करणाऱ्या दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. व अशा सर्व ग्रामपंचायतींची चौकशी करण्यात येईल असेही आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.