ठरलेल्या आवर्तनानुसार पाणी वाटप करा- पालकमंत्री बाळासाहेब पाटील

0 झुंजार झेप न्युज

कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न 

सातारा,दि.9: सध्याचा उन्हाळा पाहता जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून कण्हेर, उरमोडी व धोम प्रकल्पमधून ठरलेल्या आर्वतनानुसार पाणी वाटप करा, अशा सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कण्हेर, उरमोडी व धोम प्रकल्पाची कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दिपक चव्हाण, अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व सातारा सिंचन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरणांमध्ये पुरेशाप्रमाणात पाणीसाठा आहे. उपलब्ध पाण्यामध्ये कण्हेर, उरमोडी व धोम प्रकल्पमधून ठरलेल्या आर्वतनानुसार पाणी वाटप करा. शेतकऱ्यांकडील पाणी पट्टी वसुलीसाठी सहकारी साखर कारखाने सहकार्य करत आहेत. खासगी साखर कारखान्यांनीही पाणी पट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे. सल्लागार समितींच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे कालवा दुरुस्तीची वेळेत करण्यात यावी, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले. 

00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.