सांगली जिल्हा जत तालुका येते रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा.
सांगली : महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सांगली जिल्हा जत तालुका येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार.असे प्रतिपादन ना.रामदासजी आठवले(केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ) यांनी केले.जत येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. *याप्रसंगी प्रमुख अतिथी
ना.रामदासजी आठवले यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार ना.रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पुण्याच्या मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर रिपाईचे राज्य सचिव विवेक कांबळे. सुरेश बाशिंग विनोद निकाळजे.संजय कांबळे जगन्नाथ ठोकळे.राजेंद्र खरात.शहाजी कांबळे.संजय कांबळे-पाटील.पिंटु माने अरविंद कांबळे.आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

