विहामांडवा येथे कामगार विभागांतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

0 झुंजार झेप न्युज

विहामांडवा येथे कामगार विभागांतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

विहामांडवा,दि.10 (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): संजयराजे निंबाळकर(माजी.सरपंच), तसेच विहामांडवा चे सरपंच नागेश आष्टीकर यांच्या हस्ते मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ.करण्यात आला. गावामध्ये ठिक ठिकाणी भोजनाचे वाटप करण्यात आले. आज पासून कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे.कष्टकरी माणसाला अन्नाचे महत्व अधिक समजते. अन्न आपण शक्ती समजतो, प्रेरणादाई समजतो, अन्नाशिवाय तर जीवनच नाही. आमचे कामगार काबाड कष्ट करतात, त्यांच्या आरोग्यासाठी व कष्ट करण्याची उर्जा मिळवून देण्यासाठी शासनाच्या कामगार विभागाने मध्यान्ह भोजन ही संकल्पना अंमलात आणली.

या योजनेच्या विहामांडवा येथे आज दिनांक (१०) रोजी शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ग्रा.प.सदस्य दिपक गाभूड, ग्रा.प.सदस्य विनोद निंबाळकर, ग्रा.प.सदस्य बाबासाहेब नाचण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, सामजिक कार्यकर्त्यां सुलोचनाताई साळूंके, प्रल्हाद ऐखंडे, राजेंद्र हुंडीवाले, प्रभाकर आवारे, मुन्ना ढाकेफळे, शब्बीर शेख, गोपीनाथ येळे,रवि नरे, उपस्थित होते.या योजनेमुळे कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या भावना दिसल्या.

फोटो कॅप्शन; विहामांडवा येथे ठीक ठिकाणी भोजन वाटप करताना संजय राजे निंबाळकर नागेश आष्टीकर व इतर मान्यवर.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.