साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीची अध्यक्ष संजय भानुदास ससाणे यांची निवड

0 झुंजार झेप न्युज

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीची अध्यक्ष संजय भानुदास ससाणे यांची निवड 

पिंपरी चिंचवड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीची अध्यक्ष पदाची निवडणूक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर, निगडी येथे पार पडली. निवडणुक पिठासीन अधिकारी म्हणुन श्री भाऊसाहेब आडागळे यांनी कामकाज पाहिले.. सदर निवडणूकीमध्ये श्री संजय भानुदास ससाणे यांची बहुमताने जयंती महोत्सव अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.      

सदर निवडणुकीस कोअर कमिटीचे सदस्य श्री भाऊसाहेब आडागळे ,श्री संदिपान झोंबाडे, मनोज तोडमल, भगवान शिंदे, नाना कसबे, सुनील भिसे, युवराज दाखले, पांडुरंग लोखंडे, सतीश भवाळ, सुरेश जोगदंड, अरुण जोगदंड, दत्तू चव्हाण, डी.पी खंडाळे, श्रीमती केसरताई लांडगे, सौ. झुंबरताई शिंदे, माजी नगरसेविका सौ.कमलताई घोलप, श्रीमती अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक रवींद्र खिल्लारे आदी उपस्थित होते.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री राजेश पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संजय ससाणे याचा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित खंड व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या, जनसंपर्क विभागाचे श्री प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.