शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख

0 झुंजार झेप न्युज

शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख

अमेरिका: अमेरिकेत शिकागोमध्ये 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर झालेल्या गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू झाला असून 59 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली आहे. या घटनेवर राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान हायलँड पार्कमध्ये गोळीबाराचा आरोपी असलेल्या 22 वर्षीय रॉबर्ट क्रिमोला पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर अटक केली.अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10 वाजता शिकागोमधील इलिनोइस येथील हायलँड पार्कमध्ये परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या परे़डवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोकांचा चांगलाच गोंधळ उडाला. प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत होता. गोळीबारानंतर परेड थांबवत पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि परिसरात अलर्ट जारी करण्यात आला.

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं आहे की, बंदूक हिंसेविरोधातील आमची लढाई सुरुच राहणार आहे. हिंसा संपवण्यासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, 'मी आणि माझी पत्नी या हिंसेच्या घटनेनं स्तब्ध झालो आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अमेरिकेच्या नागरिकांना दु:ख पोहोचवण्यात आलं. या बंदूक हिंसेविरोधात आमचा संघर्ष सुरु राहील.'

छतावर लपला होता हल्लेखोर

स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर हल्ला करणारा हल्लेखोर छतावर लपून बसला होता. 'द हिल' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या गोळीबारातील हल्लेखोर अद्याप फरार आहेत. एक आरोपी रॉबर्ट क्रिमो याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.