पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली 

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे ७० नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे ८, ५, ५, ७, ९, ५, २३ आणि ८ नागरिकांनी जनसंवाद सभेत सहभाग घेऊन विविध तक्रारवजा सूचना मांडल्या.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, समाज विकास विभागाचेउप आयुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड , राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात यांच्यासह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आदी उपस्थित होते.  

जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. पाणीपुरवठा स्वच्छ व योग्य दाबाने करण्यात यावा, रस्त्यावरील फुटलेले धोकादायक चेंबर दुरुस्त करावे, खचलेल्या फुटपाथ दुरुस्तीचे काम जलदगतीने करावे, नाल्यातील कचरा काढावा, अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करावी, शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नवीन नळजोडणी देण्याची प्रक्रिया जलद करावी, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून धूरफवारणी करावी, खोदलेल्या रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीतील आणि रहदारीस अडथळा ठरणारी कामे तात्काळ पूर्ण करावीत, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता नियमित करावी, रहदारीस अडथळा निर्माण होत असलेली तसेच धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी करावी अशा सूचना नागरिकांनी आज झालेल्या जनसंवाद सभेत मांडल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.