जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप

0 झुंजार झेप न्युज

 जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप

पिंपरी चिंचवड,दि.29: मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा" या ब्रीदवाक्यानुसार मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अपंगत्व हे शरीराला आलेले असते. पण अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास भरला. त्यांना आधार दिला तर हे अपंगत्व मानसिक पातळीवर जात नाही. त्यासाठी समाजातील धडधाकट आणि आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्याच भवतालच्या अपंगांना आधार देण्याची गरज आहे. ही गरज ओळखून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप गेल्या अनेक वर्षांपासून अपंगांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी जयपूर फूटचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहेत. मधल्या काळात कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे या उपक्रमामध्ये खंड पडला होता. पण आता कोरोनाच्या संकटाला तोंड देऊन समाजजीवन पूर्वपदावर आलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांना जयपूर फूटचे मोफत वाटप करण्यासाठी शिबीर घेण्यात आले. 

शिबीरात सहभागी अपंगांची तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करण्यात आली. कृत्रिम पाय किंवा बसवणे शक्य असेल त्यांच्या पायाचे मोजमाप करण्यात आले. त्यानुसार संबंधित अपंगांना जयपूर फूट बसवण्यात आले. या शिबिराचा ३१४ अपंग नागरिकांनी लाभ घेतला. शिबीरात सहभागी १८६ अपंगांना जयफूर फूट मोफत बसवण्यात आले. त्याचप्रमाणे ८५ अपंगांना कॅलिपर्स, २८ अपंगांना व्हिलचेअर आणि १५ अपंगांना ट्राय सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंगोळकर, बाबा त्रिभुवन, महेश जगताप, नवनाथ जांभूळकर , शिवाजी कदम, अमर आदियाल, विनोद तापकीर, योगेश चिंचवडे, शेखर चिंचवडे, माऊली जगताप, संजय मराठे, माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, आरतीताई चोंधे, निर्मलाताई कुटे, उषाताई मुंढे, कोमलताई गौंडाळकर, राणीताई आदियाल, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्वलाताई गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.