सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार

0 झुंजार झेप न्युज

सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार 

पिंपरी चिंचवड,दि.29: सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जुलै २०२२ अखेर सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, मनोज माछरे, चारुशीला जोशी, गणेश लोंढे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

 माहे जुलै २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, कार्यालय अधिक्षक लक्ष्मण काळे, प्रभाकर शेलूकर, कनिष्ठ अभियंता उल्हास भालेराव, उपशिक्षिका कल्पना गोलहार, नयना घोलप, वाहनचालक रामदास गव्हाणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हंसराज साळवे, मनोरंजन वागतकर, इले. मोटार पंप ऑपरेटर प्रकाश जाधव, मजूर मधुकर जाधव, रखवालदार किशोरीलाल यादव यांचा समावेश आहे.तसेच जुलै २०२२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये मुख्य लिपिक सुधीर माने, स्टाफ नर्स वनिता माकर, सफाई कामगार सुरेखा वाघचौरे, सफाई सेवक विजेंद्र सौदे, रेखा गोहर, गटरकुली हनुमंत तेलगू यांचा समावेश आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.