खाजगी कंपनी ह्यांना शौचालय व दुकान गाळा पिंपरी चिचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी बांधून दिल्याबाबत आक्षेप -सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड : निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान समोर आण्णा भाऊ साठे बस स्टॉप येथे स्मार्ट सिटी अंतगत खाजगी कंपनी ह्यांना शौचालय व दुकान गाळा पिंपरी चिचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी बांधून दिल्याबाबत आक्षेप असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व स्मार्ट सिटी कंपनी ह्यांनी सदर ठिकाणी खाजगी कंपनी ह्यांना १५ वर्ष करारनामा करून सदर शौचालय व दुकान गाळा वापर करण्यासाठी दिला.असून सदर बांधकाम बेकादेशीर असून बांधकाम परवानगी घेण्यात आली नाही तसेच स्मार्ट सिटी अंतगत १५ वर्ष करारनामा करून शौचालय व दुकान गाळा खाजगी कंपनी ह्यांना वापर करण्यासाठी १५ वर्ष करारनामा करण्यात आला असून नागरिकांना वेगळा संशय येत असून स्मार्ट सिटी नियमानुसार करारनामा करण्यात आला नसून भुमी जिंदगी विभाग ह्यांच्या कडे परवानगी घेण्यात आली नाही किंवा भुमी जिंदगी विभाग ह्यांना कल्पना देण्यात आली नाही तसेच फ क्षेत्रिय अधिकारी ह्यांना कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना अर्ज देण्यात आला नाही.
पिंपरी चिचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग ह्यांना सुद्धा स्मार्ट सिटी अंतगत बांधकाम परवाना अर्ज देण्यात आला नाही सदर शौचालय व दुकान गाळा बांधकाम बेकादेशीर असून स्मार्ट सिटी अंतगत भष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे खाजगी कंपनी ह्यांना टेंडर किंवा निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने जागा स्मार्ट सिटी अंतगत उपलब्ध करून देण्यात आली आहे ह्या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांना शौचालय वापर करण्यासाठी शुल्क आकारले जावू नये व ह्या ठिकाणी जे गाळा दुकान स्मार्ट सिटी अंतगत बांधकाम करण्यात आले आहे त्या ठिकाणी आण्णा भाऊ साठे वाचनालय सुरू करण्यात यावे ही नम्र विनंती अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले .

