महसुल विभागामार्फत ई पीक पाहणीसाठी एक वैशिष्टपूर्ण नव्याने विकसित मोबाईल अ्ॉप तयार करण्यात आले.
पुणे,दि.10 ( बबन खेसे खेड प्रतिनिधी): महसुल विभागामार्फत ई पीक पाहणीसाठी एक वैशिष्टपूर्ण नव्याने विकसित मोबाईल अ्ॉप तयार करणेत आलेला असून त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन दावडी येथील तलाठी श्री.एस.व्ही.शेळके यांनी दावडी येथे शेतकऱ्यासमोर मार्गदर्शन करताना सांगितले.पीक पाहणी अ्ॉप डाऊनलोड करून घेण्याबाबत तसेच शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मोबाईल अ्ॉपची माहिती व प्रशिक्षण यावेळी तलाठी यांचेकडून उपस्थित शेतकरी बांधवांना देण्यात आले व युद्धपातळीवर सदर नव्याने सुधारित जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे पिकपाहणी नोंदविणे चालू असेलचे यावेळी सांगणेत आले.सदरची पीक पाहणी अ्ॉपमध्ये दर हंगामामध्ये भरलेस शेतकरी पिक विमा,कृषी,बँक व सोसायटी कर्ज,पीक नुकसानभरपाई व तसेच शेतीपूरक सर्व योजनांसाठी उपयुक्त पडणार आहे.तसेच,सदर पीक पाहणी करताना सर्व वाडी वस्तीवर पोटखराब वर्ग1 मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्रात घेणेबाबतच्या परिपत्रकाबाबत माहिती देणेत आली व कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरून घेणेत आले.पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ekyc करून घेणेबाबत मार्गदर्शन करणेत आले व अपुंर्ण माहिती भरलेल्या अर्जदार यांचे online माहिती तलाठी स्तरावर भरून घेतलेने अनेक खातेदारांचे लाभ सुरु केले असून त्यांचे खात्यावर जमा केलेबाबतची माहिती तलाठी यांनी यावेळी दिली.
वरील सर्व योजनांना उपस्थित सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला व तलाठी यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील तत्परतेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.तसेच पूर्व भागातील सर्वात मोठे गाव असलेने खातेदार शेतकऱ्यांची संख्या अधिक असलेने सर्व 12 वाड्यांवर माहितीचे बोर्ड तयार करून युद्धपातळीवर उर्वरित खातेदार आवाहन केले. उर्वरित खातेदार यांना प्रशिक्षित तलाठी मित्र/कृषी मित्र यांचे मार्फत वरील कामकाज करून घेनेबाबत आवाहन करणेत आले.

