पवना, इंद्रायणी संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या ! - महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना सांकडे

0 झुंजार झेप न्युज

- नागरिक-प्रशासन यांच्या सहयोगाने जागती, प्रत्यक्ष कामावर भर द्या

पिंपरी । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनदायिनी असणाऱ्या पवना आणि इंद्रायणी या दोन नद्या प्रदूषण मुक्त होऊन स्वच्छ-सुंदर- हरित होत प्रवाही होण्यासाठी सामाजिक संस्था नागरिक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने शहरात जागृती आणि प्रत्यक्ष काम कसे करता येईल? याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे सांकडे शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना घातले. पवना आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर जलबीरादरी संस्थेचे नरेंद चुग, विनोद बोधनकर, सुमंत पांडे, अविरत श्रमदान संस्थेचे सचिन लांडगे, डॉ. निलेश लोंढे आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी तर्फे गणेश बोरा आदी उपस्थित होते.

या भेटीत नदीची सध्य परिस्थिती, प्रदूषणाची कारणे आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. तसेच, नदी संवर्धन, नदी स्वच्छ्ता अभियान, जनजागृती मोहीम , जल दिंडी, नदीयात्रा , जलपर्णी, नदीत मिसळणारे सांडपाणी, नदी किनारी मार्शलमार्फत कचरा टाकण्यास अटकाव करणे, नदीत मिश्रित होणारा घनकचरा प्लास्टिक याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नदी संवर्धनासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, स्वयंसेवी संस्था- संघटनांच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.