राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनामहाराष्ट्रात फिरु दिले जाणार नाही

0 झुंजार झेप न्युज

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा राज्यपालांना इशारा

गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी, राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली- राज्यपालांना बांगड्या भेट देण्यात येणार

पिंपरी-चिंचवड,दि.20: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागच्या काही काळापासून वादग्रस्त विधाने करत आहेत. विशेषतः महापुरुषांबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरलेली आहे. औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असं कोश्यारी म्हणाले.

भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे. आजच्या नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं असल्याचं बोललं जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या तीव्र निषध केला असून, राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तसेच त्यांना बांगड्या पाठवून देणार असल्याचाही इमेल पाठविण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती पोलिस आयुक्त व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही काळभर यांनी सांगितले आहे.

यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त बोलले होते. “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.” या विधानावरुनही राज्यात गदारोळ झाला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.