निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक- पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पालघर,दि.15: धकाधकीच्या जिवनामध्ये व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी परवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.चारोटी, ता. डहाणू येथे व्यायाम शाळेचे उदघाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यायाम शाळेचे संचालक फरीद मनेशीया, आमदार श्रीनिवास वनगा, निरंजन डावखरे माजी आमदार अमित घोडा, विलास तरे तहसीलदार अभिजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वी प्रत्येक गावामध्ये व्यायाम शाळा होत्या कुस्तीसाठी तालीम मिळत असे त्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहत असे आधुनिकतेच्या काळामध्ये व्यक्ती व्यस्त असल्यामुळे व्यायाम शाळेचे महत्व कमी होत गेले. विविध व्याधींमुळे आज तरुणांना व्यायामाची गरज भासत असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.घर तिथे नळ ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डहाणू नगरपरिषद यांच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण केले, त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, निरंजन डावखरे, नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

