शेतकऱ्यांना दहा तास वीज मिळावी व पिक विमा त्वरित मिळावा यासाठी चक्काजाम आंदोलन
पैठण (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): शेवगाव व पैठण शहागड या रोडवर शेतकऱ्यांच्या उसाला कापसाला सोयाबीनला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना दिवसाचीदहा तास विज मिळावी तसेच अतिवृष्टीच्या अनुदान व पिक विमा त्वरित मिळावा यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलन प्रसंगी औरंगाबाद जिल्हा युवा अध्यक्ष माऊली पाटील मुळे तसेच पैठण तालुका युवा अध्यक्ष संतोष पाटील तांबे कसे दिलीप पाटील नरके भाऊराव नरके बाबुराव बोरुडे शरद दादा नरके आबासाहेब नरके नामदेव नरके ऋषिकेश नरके बळीराम खोसे मोहनराव वाकडे सुनीलराव कुलकर्णी अशोकराव नरके सतीश राव नरके चंद्रकांत निकाळजे प्रशांत कुलकर्णी महेश राव भिसे एकनाथराव बेळगे गोवर्धन आवारे इत्यादी सह हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

