मूंबईत पोलीस भरती साठी येणार्या यूवकांना नागरी सूविधा उपलब्ध करून देण्यात यावी:उषाताई रामलू,अध्यक्ष मूंबई प्रदेश महीला आघाडी
मुंबई,दि.24: मूंबईत पोलीस भरती साठी येणार्या यूवकांना नागरी सूविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणी करीता महाराष्ट्राचे मूख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री यांचे रिपाई-आ मूंबई प्रदेश महीला आघाडी लक्ष वेधणार आपनास माहीतीच असेल जेव्हा जेव्हा शासनाच्या वतीने पोलीस भरती जाहीर करते त्या वेळेस हजारो यूवक आवेदन पत्र भरतात शासकीय नौकरी मिळेल व आपल्याला ही देशाची राज्याची सेवा करण्याची संधी मिळेल या हेतूने हे यूवक पूढे सरसावत शासनाचे जे जे नियम पाळून हे या पोलीस भरतीसाठी अतोनात परीश्रम घेत असतात,व आपन ही आपल्या परीसरातील कींवा नातेवाईक व आत्पेष्ट कींवा मित्र मडळीतील अनेक यूवकांना या भरतीसाठी तयारी करताना बघतो व या भरतीत अनेक यूवक हे खेड्यापाड्यातून व अनेक हाल अपेष्टा सहन करून देशसेवा व राज्याची सेवा करून एक शासकीय नौकरी मिळेल या हेतूने परीश्रम करत असल्याचे आपन बघीतले आहे परंतू एवढे करून ही पोलीस भरतीसाठी अर्ज सादर केल्यानंतर ही यांच्या हाल अपेष्टा काही संपत नाहीत हेच चित्र या भरती वेळेस व परीक्षेत बसण्याच्या वेळेस या यूवकांच्या नशीबी येते हे चित्र आपन जेव्हा या पोलीस भरतीच्या वेळेस ज्या ठिकाणी केंद्रावर घेतल्या जातात त्या ठीकाणी जर बघीतले तर या यूवकांना कसल्याही सूविधा शासन पूरविताना दिसत नाही ना त्यांच्या खाण्यापिण्याची सोय असते न दैनंदिन जीवनात ज्या सूविधा उपलब्ध असल्या पाहीजेत त्या सूद्धा त्यांना मीळत नसल्याचे जानवते मूंबईतील अनेक केंद्रावरती जावून बघीतले तर हे पोलीस भरती साठी येणारे यूवक चक्क फूटपाथ,रस्त्यावरील दूभाजकामद्धे झोपलेले व मिळेल तिथे आपला निवारा शोधतात व देश सेवे साठी सज्ज होतात,तर मग शासनाची काहीच जवाबदारी नाही का? हे भरतीसाठी आलेल्या देशसेवा व राज्यसेवा करणायाची प्रबळ इच्छा ठेवणार्या यूवकांनची परवड का? उद्याच्या भविष्याची ही अवेहलना का? त्यांना फूटपाथ व रस्त्यावर झोपण्याची वेळ सरकार का येवू देते हे यूवक आपल्याच देशाचे नागरीक आहेत! ते काही बांग्लादेश कींवा पाकीस्तानी नाहीत मग या भारतीय यूवक जो देशसेवे साठी पूढे येत आहे त्यांच्या कडे शासन इतके दूर्लक्ष का करते त्यांना सोयी सूविधा का पूरवत नाही.त्याची भरती वेळेस अवहेलना का? त्यांचा दोष काय?त्यांना देशसेवा करायची आहे हा त्यांचा दोष आहे का?की या भरती साठी ते मोठ्या संख्येत कबाड कष्ट करून पूढे येतात हा त्यांचा दोष आहे?आपल्याला ही पोलीस प्रशासनात एक चांगली कामगीरी करता यावी आपन ही देश सेवा करता यावी हे स्वप्न बाळगणे हा त्यांचा दोष आहे का?
काल मूंबई विद्यापाठा समोरील भिम छाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाची मूंबई प्रदेशची बैठक संपवून जेव्हा निघत होतोत त्या वेळेस मूंबई विद्यापीठा समोरील रस्त्यावर फूटपाथ व चक्क दूभाजकावर-डिवायडर वरंती हे यूवक झोपलेले बघायला मिळाले व हेच चित्र मूंबईभरतील भरती केंद्रावरती असते या यूवकांशी रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी मूंबई प्रदेश अध्यक्षा *मा.उषाताई रामलूजी* यांनी गाडी थांबवून यांच्या व्यथा जानून घेतल्या व संवाद साधला व लवकरच या यूवकांच्या गंभीर समस्येवर महाराष्ट्राचे मूख्यमंत्री *मा.एकनाथजी शिंदे* व उपमुख्यमंत्री *मा.देवेंद्र फडणवीसजी* व रिपाई-आ राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री *मा.ना.रामदासजी आठवले साहेब* यांना लेखी निवेदना द्वारे या मूंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या व देशाचे उद्याचे भविष्य या यूवकांना नागरी सोयीसूविधा पूरविल्याच पाहीजेत ही मागणी करणार असल्याचे या यूवकांशी संवाद साधताना बोलत होत्या या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष *मा.रेश्मा खानजी*,महीला आघाडी गोरेगाव अध्यक्ष *मा.छायाताई र.राऊतजी*,गोरेगाव तालूका अध्यक्ष *रमेश वि.पाईकराव*,रोजगार आघाडी गोरेगाव अध्यक्ष *मा.बबलू ढवारेजी*,वार्ड क्र. 54 अध्यक्ष *मा.लखन प्र.पाईकराव* उपस्थित होते.

