संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडी गावठाण येथील भुयारी मार्ग दुरुस्ती करण्यात यावे : सचिन काळभोर

0 झुंजार झेप न्युज

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडी गावठाण येथील भुयारी मार्ग दुरुस्ती करण्यात यावे : सचिन काळभोर 

पिंपरी चिंचवड,दि.25: भक्ती शक्ती उड्डाणपूल ते मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी भुयारी मार्ग काम सुरू असून त्या ठिकाणी काही समाजकंटक ह्यांनी भुयारी मार्ग काम बंद पाडले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना ईमेल करुन तक्रार दाखल करण्यात आली आहे.निगडी भागातील नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत होती त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी निगडी गावठाण ते निगडी एस बी आय बँक ह्या ठिकाणी भुयारी मार्ग काम सुरू केले होते.

त्या ठिकाणी काही समाजकंटक ह्यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून काम बंद केले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी निगडी गावठाण येथील भुयारी मार्ग काम संपुर्ण करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली आहे मुंबई पुणे महामार्गावर निगडी गावठाण येथील रस्ता अरुंद असून भुयारी मार्ग काम सुरू असल्याने निगडी गावठाण ह्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू होणार पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज पालखी दिनांक १२ /६/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार असून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी येथील भुयारी मार्ग काम संपुर्ण करण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.