भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न
पुणे,दि.25: दि.23/04/ 2023 वार रविवार रोजी श्री संकल्प फाउंडेशन पद्मावती पुणे लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, ससून हॉस्पिटल नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत, मोतीबिंदू तपासणी व मोफत लेन्स व शस्त्रक्रिया असे भव्य आरोग्य शिबिर स्थळ सहकार नगर पद्मावती मंदिराजवळ बुद्ध विहार पद्मावती पुणे इथे तळजाई वसाहत पद्मावतीतील सर्व परिसरातील नागरिकानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 246 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी 48 नागरिकांची नोंद झाली. अशा अनेक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला
या कार्यक्रमाला उपस्थित श्री संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष श्री.गणेश गांधी उपाध्यक्ष सौ.नीलम गांधी सचिव श्री.मदन कुलकर्णी व श्री संकल्प फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज चे संस्थापक व झोन चेअर पर्सन ला. विठ्ठलराव वरुडे पाटील ला. विलास आवटे ला. हेमलता जैन आणि मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

