पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रम

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रम 

पिंपरी चिंचवड,दि.22: पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग आणि उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, ई क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी,सहाय्यक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, राजेश वसावे, ग्रीन यात्रा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप त्रिपाठी व उद्यान विभागाचे अधिकारी, मुकादम, कर्मचारी तसेच नागरिक, जेष्ठ नागरिक, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमातआयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते जागतिक वसुंधरा दिन आणि अक्षय तृतीयादिनानिमित्त केशर जातीचा आंबा या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच इतर मान्यवरांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.यानंतर उपस्थितांनी माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पृथ्वीच्या संरक्षणाची त्याचबरोबर पर्यावरणाच्या संरक्षणाची, झाडे लावण्याची सामूहिक शपथ घेतली.

ग्रीन यात्रा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप त्रिपाठी यांनी मियावाकी संकल्पनेविषयी माहिती देताना ग्रीन यात्रा या संस्थेमार्फत कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यान दिघी उद्यान येथे १८ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने झाडांची लागवड करण्यात येत असून त्यातील पहिल्या टप्यातील झाडांना एक वर्ष झाले असून या एकाच वर्षात झाडांची वाढ पाच ते सहा फुटापर्यंत झाल्याचे दिसून येत आहे असे सांगून या झाडांची अतिशय चांगल्या पद्धतीची सधन लागवड आहे. यामध्ये स्थानीय प्रजातीच्या झाडाची लागवड येथे करण्यात आली असून एक प्रकारे जैव विविधता जपण्याचे काम सुरु आहे असे सांगून त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर केली. त्याचबरोबर भविष्यातील असणाऱ्या लागवडीबाबत माहिती दिली.उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी जून-जुलै महिन्यात करण्यात येणाऱ्या झाडांच्या लागवडीबाबत व उद्यान विभागाचे आधुनिकीकरण, देखभाल दुरुस्ती रस्त्याच्या दुभाजकांचे शुशोभीकरण याबाबतीत माहिती सादर केली.

आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी बोलतांना नागरिकांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आज उपलब्ध संसाधनांचा व्यवस्थित वापर करणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त झाडे लावून वृक्षसंवर्धन त्याचबरोबर वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले. विविध सेवाभावी संस्था, सी एस आर च्या माध्यमातून औद्योगिक कंपन्या यांनी पुढाकार घेऊन शहरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आपले योगदान द्यावे,त्याचबरोबर नागरिकांनी दैनंदिन इ-व्हेईकल चा वापर करावा जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल,त्याचबरोबर सौर ऊर्जेचा वापर करावा . वीज आणि पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा. जल, जमीन जंगल हे संसाधन अत्यंत महत्वाचे आहेत यांचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांनी इमारतीचे बांधकाम करत असताना रेन वाटर हार्वेस्टिंग याचा समावेश करावा. यावर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना इन्व्हेस्ट इन अवर अर्थ प्लॅनेट अशी आहे मधमाशी हा जगातील अत्यंत महत्वाचा कीटक असून त्यामध्ये मधमाशा ह्या परागीकरण करण्यासाठी मदत करत असतात. मोठ्या प्रमाणात फळे व अन्यधान्य यांची निर्मिती परागीकरणातून होत असते. 

त्यामुळे मधमाशांचे जतन करण्याची काळाची गरज आहे. मधमाश्यांची संख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे . भविष्यामध्ये मधमाशा नाही राहिल्या तर प्राणीजात सुद्धा नष्ट होण्याचा धोखा उद्भवू शकतो. यामुळे जास्तीत जास्त पद्धतीने मधमाश्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मधमाशी हा जरी लहान किटक असला तरी परागीकरण करण्याचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या साठी सर्व नागरिकांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मदत करावी असेही आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.