विहामांडवा विविध कार्यकारी सोसायटीवर भाजपाचा झेंडा

0 झुंजार झेप न्युज

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांनी मारली बाजी

विहामांडवा,दि.01: पैठण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या विहामांडवा गावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकत सर्वपक्षीय पॅनलवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.विहामांडवा,चिंचाळा,चौढाळा, मिरखेडा या चार गावच्या एकत्रित असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांचा रेणुकामाता शेतकरी विकास पॅनल विहामांडवा येथील शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांचा बलखंडेश्वर सोसायटी बचाव पॅनल अशी दुरंगी लढत झाली यामध्ये रेणुका माता शेतकरी विकास पॅनल ने ४५० मताधिक्याने बलखंडेश्वर सोसायटी बचाव पॅनल चा पराभव केला. शनिवार दि २९ रोजी सकाळी ८ ते ४ वेळात मतदान पार पडले यामध्ये एकूण सभासद १०९९

पैकी ९५१ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला चार नंतर मतमोजणी झाली यामध्ये भाऊसाहेब काळे यांना सर्वाधिक ७०१ मतदान मिळाले. एकतर्फा विजय मिळवत विरोधकांचा दारुण पराभव केला यामध्ये सर्व पॅनलला सुमारे ४५० मताची लीड मिळाली. विजयी उमेदवारामध्ये सुनिल डुकरे,विक्रम करताडे,नारायण गाभूड,विद्या थोटे,शिवाजी बोडखे,ज्ञानदेव बोडखे,राजेंद्र भिंगारे,शंकर धायकर,दिनकर बाबर,राजेंद्र तुपे,सुमन नाटकर, सुमित्रा बोडखे, हे विजयी उमेदवार आहे तर यांच्या विजयासाठी विजयकुमार दुग्गड,नाना पाटील गाभुड,राजेंद्र गाभुड,संजय गाभुड,सतीश काळे,डॉ.गणेश नादरे,सुभाष नवपुते, विवेक तूपकरी,अविनाश तुपकरी, शिवा अप्पा सुरडकर,शेषराव पानसरे,निवृत्ती डुकरे,शिवाजी गायकवाड,प्रल्हाद लोखंडे, संतोष गायकवाड,सुदाम हकम, अजय सांगळे,सचिन पवार, गोकुळ मोरे,सोनू नाटकर, परमेश्वर शिंदे,बाळासाहेब शिंदे, उद्धव डुकरे,मोहन डुकरे, विलास संत,सुदामराव येवले, दिगंबर बोडके,हरिभाऊ बोडखे,विलास तुपकरी, आदींनी परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.