महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड,दि.01: आज सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे १ मे २०२३ महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासाणारे व साधू संतांच्या पद स्पर्शाने पावन ज्याचा पाया रचला, हुतात्मा आणि कामगार वर्गांनी संघटित होऊन त्याला आकार दिला असा हा समृध्द, संपन्न महाराष्ट्र असाच  पुढे वाढत राहो, फुलत-बहरत जावो तसेच कामगार दिनानिमित्त कामगारांचा देखील गौरव होणे आवश्यक आहे. कामगारांनी देशाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्याला मी मानाचा मुजरा करतो व सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी मुख्य संघटक अरूण बोऱ्हाडे यांनी कामगार दिनाची माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन केले. 

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, हरिभाऊ तिकोणे, ज्ञानेश्वर कांबळे, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, देवेंद्र तायडे, ग्रंथालय सेल अध्यक्ष संग्राम चव्हाण, सरचिटणीस सुदाम शिंदे, राजन नायर, उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, अनंत सुपेकर, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब पिल्लेवार, विजया काटे, अशोक मोरे, अरुणा चौवरे, सोमनाथ मोरे, अण्णा पाखरे, श्रीकांत कदम, महेंद्र शितोळे, इमरान शेख, रवींद्र सोनवणे, महेश माने, राजकुमार माने बापू सोनवणे, राजू चांदणे, सुरेश पवार, प्रकाश पाटील,प्रिया देशमुख, पर्यावरण सेल उपाध्यक्ष शरद नवले, लता पिंपळे, काशिनाथ शेलार इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.