'भाजप हटाव देश बचाव' ला कर्नाटक मधून प्रारंभ - अजित गव्हाणे

0 झुंजार झेप न्युज

'भाजप हटाव देश बचाव' ला कर्नाटक मधून प्रारंभ - अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड,दि.13: महागाई, भ्रष्टाचार आणि जातीय राजकारणाला कंटाळलेल्या कर्नाटकमधील जनतेने भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर दिले आहे. 'भाजप हटाव देश बचाव'ला कर्नाटक मधून प्रारंभ झाल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत

काँग्रेस एकहाती सत्ता काबीज केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, देशातील लोकांचा मुड बदलत आहे. मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे देशात मोदी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे. याचा प्रत्यय कर्नाटक विधानसभा निकालातून आला आहे. तसेच आगामी लोकसभा आणि राज्यातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनताही भाजप आणि शिंदेसेनेला धडा शिकविणार आहे, असल्याचेही गव्हाणे म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.