रहाटणीतील पावसाळी पूर्व कामांचा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी घेतला आढावा

0 झुंजार झेप न्युज

नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी तातडीने कामे पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी चिंचवड,दि.25: सन्माननीय रहाटणीकर बंधू आणि भगिनींनो,रहाटणी येथील पुरंदर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाची नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आज (बुधवारी) पाहणी केली.यावेळी बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी, साई कॉलनी मधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशा सूचनाही अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत.

तसेच अनेक दिवसांपासून रहाटणी प्रभागातील अनेक भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणीपुरवठा व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात. व ही सर्व कामे पावसाळ्या पूर्वीच करण्यात यावे, अशाही सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.