महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी,दि.25: महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.निमित्त होते ... शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या शासन आपल्या दारी या महत्वाकांशी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला 'जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकली व चार बसेसच्या लोकार्पणाचे..

ते पुढे म्हणाले, या वाहनांमुळे जिल्हयातील गुन्हेगारी कमी होण्यास निश्चितपणाने मदत होईल. पोलीसांच्या घर निर्मितीला त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलीस सक्षमपणाने कार्यरत राहील्यामुळे नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. नागरिकांना पोलीसांची भिती वाटता कामा नये तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे. 55 वर्षावरील वाहतुक पोलीसांना शासनाने बंदोबस्ताबाबत सवलत दिली आहे. पोलीसांना अनेक वेळेला आनंदाचे क्षण त्यांच्या कुटुंबियासोबत घालवयाचे असतात तथापि कार्यबहुलतेमुळे त्यांना ते शक्य होत नाही. गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलीसांसोबत दिवाळी साजरी केली असल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. 

याप्रसंगी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.