आमदार प्रकाश सुर्वे यांनी प्रभाग क्र.११ ऋषीवन अभिनवनगर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली

0 झुंजार झेप न्युज

आमदार प्रकाश सुर्वे यांनी प्रभाग क्र.११ ऋषीवन अभिनवनगर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली

मुंबई / ठाणे: मागा ठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार/विभागप्रमुख श्री.प्रकाशदादा सुर्वे यांनी प्रभाग क्र.११ ऋषीवन अभिनवनगर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली तसेच वाहतूक आणि नागरिकांना होणारी समस्या दूर करण्यासाठी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय लाड साहेब, रस्ते विभागाचे अधिकारी श्री.अवसारे साहेब आणि पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी करून लवकरच सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.तसेच काजुपाडा विभागातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे कडेला असणाऱ्या जलवाहिन्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी जलविभागाच्या श्रीमती.मांडवकर मॅडम यांना निर्देश देण्यात आले आणि येत्या १० ते १५ दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले सदरवेळी श्री.नंदकुमार सुर्वे,उपविभागप्रमुख श्री.राजेश कासार,सौ.मनीषा सावंत, सौ.रागिनी सिंग,श्री.सुशील शिंदे,श्री.सचिन कदम,श्री.शांताराम काते,श्री.सूर्यकांत कदम पदाधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.