क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियान चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला
मुंबई,दि.30: क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियान चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला. त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातून प्रतिसाद मिळेल व समाजात जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल. शालेय मुलांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर होत आहे. मौखिक आजारांना रोखण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. तेंडुलकर यांनी कधीही तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात केली नाही त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीने सदिच्छादूत म्हणून शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत हा तरुणांचा देश आहे, जीवन जगताना तंदुरुस्त दिसणे आणि निरोगी असणे या भिन्न गोष्टी आहेत. निरोगी जीवन जगणे, आयुष्याची मॅच जिंकणे स्वतःच्या हाती आहे. राज्य शासनाच्या स्वच्छ मुख्य अभियानामध्ये जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करेन – सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाच्या सदिच्छादूताची जबाबदारी स्वीकारल्यामुळे या अभियानाची व्याप्ती सर्वदूर पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल. कॅलेंडर, कॅम्प व कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जाणार आहे – मंत्री गिरीष महाजन

