सावित्रीमाई फुले वसतिगृहातील दलित मुलीच्या हत्येप्रकरणी हलगर्जीपणा करणा-या वार्डनवर कारवाई करा-केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले
मुंबई,दि.10: मुंबईतील चर्नीरोड येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील दलित मुलीच्या झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षिका वार्डन वर्षा अंधारे यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि राज्यभरातील सर्व मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेचे ऑडीट करण्यात यावे ; शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची सांत्वनपर मदत बळीत मुलीच्या कुटुंबाला करण्यात यावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांनी केली.आज ना. रामदासजी आठवले यांनी चर्नीरोडच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाला भेट देवुन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस आणि माजी राज्यमंत्री अविनाशजी महातेकर व आदि उपस्थित होते तर एसीपी राजेशसिंह चंदेल आणि पोलीस तपास अधिकारी बांगर, वस्तीगृहाच्या अधिक्षिका वर्षा अंधारे आणि सोनाली मोरेही उपस्थित होते.
बळी गेलेली मुलगी ही खेरवाडी बांद्रा येथे शिक्षण घेत होती. 2022 पासुन तिने या वसतिगृहात प्रवेश केला होता. ती मुळची अकोला विदर्भातील होती. या दलित मुलीवर येथील वॉचमन व धोबीचे काम करणा-या व्यक्तीने तिचा विनयभंग करुन तिचा गळा आवळुन तिची हत्या केली. आणि त्यानंतर त्याने स्वतःही रेल्वे स्थानकात जावुन रेल्वेखाली आत्महत्या केली. हया प्रकरणाची मुंबई पोलीसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. अशी मागणी ना. रामदासजी आठवले यांनी केली. या महिलांच्या वसतिगृहात पुरुष कर्मचारी काम करत होता. सुरक्षा रक्षक पुरुष होता या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये संबंधीत आरोपी हा पाईपला धरुन वरच्या माळयावर चढत होता अशी माहिती मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच हत्या झालेली मुलगी वसतिगृहाच्या चौथ्या माळयावर एकटीच थांबली होती. ही बाब वार्डन वर्षा अंधारे यांना माहित होती. त्यांनी आपल्या अधिकारात इतर मुलीसोबत तिला ठेवायला पाहिजे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केला असल्यामुळे या वसतिगृहाच्या अधिक्षका वार्डन अंधारे यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी ना. रामदासजी आठवले यांनी केली.
या प्रकरणी मुलीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतुन 10 लाख रुपयाची तातडीची सांत्वनपर मदत केली पाहिजे अशी मागणी ना. रामदासजी आठवले यांनी केली. मुलीच्या पालकांनी या प्रकरणी अॅट्रोसिटी अॅक्टनुसारही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी ना. रामदासजी आठवले यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करुन संबंधित वसतिगृह शिक्षण खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे याबाबत सर्व महिला वसतिगृहाचे सुरक्षा ऑडीट करावे, महिला सुरक्षासाठी या वसतिगृहांत शासनाचे सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत.खाजगी सुरक्षा रक्षक नेमु नयेत.याबाबतही सुचना केलेल्या आहेत. आणि प्रकरणात एकुणच आपल्या कर्तव्यात कसुर करणा-या संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ना. रामदासजी आठवले यांनी केली आहे.तसेच बळीत मुलीच्या आई वडिलांची ना. रामदासजी आठवले यांची आज बांद्रा येथे भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. दलित मुलीची झालेली हत्या निषेधार्ह आहे;असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची खबरदारी शासनाने घ्यावी अशी मगणी मा. ना.रामदास आठवलेजी यांनी केली आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस महीला आघाडी एड.आशाताई लांडगेजी,महाराष्ट्र प्रदेश महीला आघाडी सरचिटणीस एड.अभयाताई सोनवणेजी, महाराष्ट्र प्रदेश यूवक आघाडी अध्यक्ष मा.पप्पू कागदेजी,मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारेजी,रिपाई-आ नेते मा.भीमराव सावतकरजी,महीला आघाडी मूंबई प्रदेश अध्यक्षा मा.उषाताई रामलूजी-आईसाहेब,रोजगार आघाडी मूंबई अध्यक्ष मा.अमीतजी तांबे,रिपब्लिकन विद्यार्थी परीषदेचे अध्यक्ष मा.सचिन बनसोडेजी,मूंबई प्रदेश कोषाध्यक्ष मा.सूनिलजी मोरेजी, व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशजी जाधव,महीला जिल्हाध्यक्ष मा.रेश्मा खानजी,उत्तर मूंबई जिल्हाध्यक्ष मा.निशा मोदीजी,मूंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.सलमान खानजी,मूंबई प्रदेश सचिव मा.सो.ना.कांबळेजी,उ.प.मुंबई जिल्हा सचिव मा.रमेश ए.पाळंदेजी,रिपाई-आ नेते मा.शिरीष चिखलकरजी, गोरेगाव तालूका अध्यक्षा महीला आघाडी मा.छायाताई र.राऊतजी,व इतर अनेक रिपब्लिकन पक्षाचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सावित्रीबाई फूले वसतिगृहाचा परीसर पीडीत महीला भगीनींला न्याय मिळाला पाहीजै व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या घोषणेने परीसर दणाणून सोडला..

