राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त

0 झुंजार झेप न्युज

• राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त

पिंपरी चिंचवड,दि.30: पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार. कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार.पिंपरी चिंचवड शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे.म्हणुन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोलजी कोल्हे, आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्यात येतील अशी माहिती यावेळेस युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली. 

"राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरातील सर्व कार्याध्यक्ष, सर्व विधानसभा अध्यक्ष, व शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी (उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, संघटक, चिटणीस व शहर कार्यकारणी सदस्य), सर्व प्रभाग अध्यक्ष व वार्ड अध्यक्ष यांना पदमुक्त करण्यात येत आहे". युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी पत्रक काढून संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करत असल्याचे सांगितले आहे.

इम्रान शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी सर्व धर्मातील युवकांना संघटनेत स्थान दिले. या दीड वर्षात शंभरावरून अधिक आंदोलने,पक्ष संघटनेचे कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सक्षमपणे राबवले. युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न,शहरातील प्रमुख नागरी समस्या, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध, महापुरुषांच्या बदनामी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने अनेक आंदोलने घेण्यात आली. त्याचप्रमाणे युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील विविध वार्डात आरोग्य शिबीर घेण्यात आले.युवका मार्फत अनेक शालेय विद्यार्थी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले.

शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात युवक संघटनेने चिंचवड विधानसभा निवडणुकीत देखील ३ मोठे युवक मेळावे,पदयात्रा,अनेक कोपरा सभा, बूथ यावर नियोजित काम केल्याचे आढळून आले आहे. फक्त चिंचवड विधानसभेत २५० युवकांची कार्यकारणी जाहीर करून युवकांनी हम किसी से कम नही हे दाखवून दिले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.