शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीत 'हर घर तिरंगा' अभियानाचा शुभारंभ

0 झुंजार झेप न्युज

मा.नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वतीने आयोजन

पिंपरी चिंचवड,दि.11: आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान ९ ऑगस्ट, २०२३ पासून राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत 'हर घर तिरंगा' या संकल्पनेचा आज (शुक्रवारी) शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी प्रभाग क्र. २७ येथे शुभारंभ करण्यात आला. माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी ज्येष्ठांच्या व महिलांच्या हस्ते शंकर जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सुमारे दोनशे नागरिकांना राष्ट्र ध्वजाचे वाटप करण्यात आले.    

याप्रसंगी चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख काळुराम बारणे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, अभियान प्रमुख माजी नगरसेवक शशिकांत कदम, भरत ठाकूर, सांगवी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, विनोद तापकीर, संदीप नखाते, शुभम नखाते, राज तापकीर, टाटा मोटर्स एम्पलोयीज युनियनचे प्रतिनिधी नामदेव शिंत्रे, नरेश खुळे, गणेश नखाते, दिलीप कुलकर्णी, बाळासाहेब पवार, ऍड.शिवाजी मोहिते, रणजित घुमरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रिकामे, संजय भोसले, ब्रम्हा सूर्यवंशी, दीपक जाधव यांच्यासह बहुसंख्येने महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.       

यावेळी शंकर जगताप म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या 'घर घर तिरंगा' या अभियानाचा शुभारंभ येथे करण्यात येत आहे. भारतीयांच्या मनात देशभक्ती जागृत रहावी तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार, हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले.दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन नामदेव शिंत्रे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.