क्रांती दिनाच्या निमित्ताने शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास महापालिकेच्या वतीने अभिवादन..
पिंपरी चिंचवड,दि.09: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसदस्य रोहित काटे, राजू बनसोडे, माजी नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेंडगे, उप आयुक्त रविकिरण घोडके, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रिय अधिकारी उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

